Bookworm Trust

बुकवर्ममध्ये पुस्तकांचा संग्रह आणि साहित्याशी संबंधित क्रियाकलाप वाढत असताना, मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, ज्यांना वाचण्यास सहज कोणतीही पुस्तकं मिळत नाहीत अशा मुलांसाठी संधींची क्षितिजे विस्तृत करणे, एक साधन तयार करणे जे लिखित शब्द समजून घेण्याची आवश्यकता सक्षम करते आणि ओळखते हे बुकवर्मचे ध्येय साध्य करताना मोबाईल आउटरीच प्रोग्राम (MOP) ची संकल्पना एप्रिल 2011 मध्ये “बुकवर्म” ला सामुदायिक जागांमध्ये मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून बुकवर्मच्या आउटरीच साइट्स ओडशेल, रीबंदर, चिंबेल, कॅक्रा, सांताक्रूझ, लिव्ह हॅप्पी इथे सुरु होत्या पण जसा माझा  बुकवर्ममधील प्रवास सुरू झाला तसच थोड्याच दिवसानंतर माझं लिव्ह हॅप्पीशी नातं जुळलं आणि पणजी ते लिव्ह हॅप्पी असागांवपर्यंत सर्व मार्गांनी ते नातं घट्ट केले. 

लिव्ह हॅप्पी ही असगावच्या मध्यभागी असलेली संस्था आहे, हा एक एनजीओ आहे जो फेली गोम्स आणि बीट्रिझ कॉन्ट्रेरास मिला (https://livehappygoa.com) यांनी स्थापन केली आहे. येथील वातावरण खरोखरच स्वागतार्ह आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक आहे. संपूर्ण रचना नारळाच्या छाटाची आहे आणि उबदार वातावरण प्रदान करते. लिव्ह हॅप्पीकडे आपली स्वतःची उत्साही टीम आहे जी संस्थेचे काम करत असते. याशिवाय लिव्ह हॅप्पी चे रत्न म्हणजे तिथे येणारी मुले. मुलांचे वय साधारणतः 6 ते 15 वर्षे आहे आणि ही मुले उर्जेने भरलेली आहेत.‌ इथे आम्ही अनेक सत्र घेतली. माझ्या गुरू सुजाता नरोना आणि आनंदिता राव यांचा ह्यात मोलाचा वाटा आहे. माझ्या काही अविस्मरणीय आठवणी सांगायच्या झाल्या तर ती मी खालील प्रमाणे मांडू इच्छितो :

बुकवर्म गाणी: माझ्या पहिल्या दिवसापासूनच मुलांनी बुकवॉर्म गाण्यांचा संग्रह उचलला आणि उत्साहाने गायला. सत्रांमध्ये मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी, विशिष्ट श्वासोच्छ्वास आवश्यक आहेत. लायब्ररीशी निगडीत गाणी चांगली चालतात आणि मुलांची वाचनाची आवडही वाढवतात हे आनंदिताने सांगितलेले रहस्य माझ्या अजूनही आठवणीत आहे. काही सत्रांमध्ये मुलांनी आम्हाला गाणी शिकवली व ते क्षण आमच्यासाठी खूप खास व हृदयाला स्पर्श करणारे होते.

कथा सांगणे व ऐकणे: कथा सांगणे हे कथात्मक चौकशीचे सर्वात जुने प्रकार आहे. या फॉर्ममध्ये नवीन असलेल्या समुदायांसाठी साक्षर व्हायला शिकणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. लिव्ह हॅप्पीमध्ये प्रत्येक मुलाकडे कथेत योगदान देण्यासारखे काहीतरी असते आणि हे मला मुलांबद्दल खूप आवडते. त्यांना कथा ऐकायाच्या असतात आणि प्रत्येक लायब्ररी सत्रासाठी नवीन – नवीन कथा हव्या असतात व ते उत्साहाने सहभागी होतात व इथेच कुठेतरी पुस्तकं आणि त्यांचं नातं घट्ट होतं आणि ते कायम तसेच राहील यात शंका नाही.

पुस्तक-चर्चा: बुक टॉकचा उद्देश म्हणजे पुस्तकाबद्दल थोडेसे बोलणे म्हणजे इतरांना पुस्तक वाचण्यास पटवून देणे आहे. कालांतराने लिव्ह हॅप्पीमध्ये बुक टॉक दर्जा खुप सुधारला आहे. प्रत्येक सत्राला दोन – दोन मुले चित्र पुस्तकाची चर्चा 2-3 मिनिटे करत असतात. जे पुस्तक त्यांना सगळ्यात जास्त आवडले आहे, त्याचा प्रचार करताना ते हृदय स्पर्शी बुक टॉक करत असतात.‌ बुक टॉक झाल्यावर त्याच्यावर प्रश्न विचारून विचारांची देवाण घेवाण करणे गरजेचे असते. लिव्ह हॅप्पीमध्ये मुले बुक टॉक सत्राची आतुरतेने वाट पहात असतात.

पुस्तक-ब्राउझिंग: या विभागात, मुले हा वेळ फक्त पुस्तके ब्राउझ करण्यासाठी, पुस्तकातील मजकूर डीकोड करण्यासाठी वापरतात. वयानुसार आणि आवडीनुसार ‘योग्य’ पुस्तकाच्या निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, वाचण्यासाठी योग्य पुस्तक शोधण्यासाठी मुलांसोबत पुस्तक-ब्राउझिंग सत्र करणे गजेचे असते. पुस्तक-ब्राउझिंगमुळे मुलांना पुस्तकाबद्दल नवीन गोष्टी समजतात व त्यांच्या कल्पनेचे विविध दालन उघडली जातात आणि लिव्ह हॅप्पीमध्ये हे प्रामुख्याने दिसून येते. 

पुस्तकांची आदला- बदल: घरी नेण्यासाठी पुस्तक निवडणे ही लायब्ररीतील सर्वात महत्वाची कृती आहे. पुस्तके शेअर केल्यावर वाचनालयाशी मुलांचे नाते घट्ट होते. मुले हे देखील शिकतात की प्रत्येक गोष्टीची मालकी असणे आवश्यक नाही आणि तो आनंद शेअर केलेल्या पुस्तकांबद्दल बोलण्यातून मिळू शकतो. तथापि लिव्ह हॅप्पीमध्ये पुस्तकांची आदला- बदल हा एक अविभाज्य भाग बनला आहे. रेकॉर्ड ठेवणे हे जबाबदारीचे साधन आहे त्यामुळे मुले स्वतःचे लायब्ररी कार्ड नोंदणी करत असतात. एखाद्या मुलाच्या वाचन पद्धती, पुस्तक घेण्याची वारंवारता समजून घेण्यासाठी लायब्ररी कार्डे डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि लिव्ह हॅप्पीमध्ये आम्ही तेच करतो त्यामुळे त्यांच्यात लायब्ररी वापरकर्ते म्हणून आत्मविश्वास आणि जागरूकता वाढली आहे.

“शेअर केल्यावर आनंद वाढतो” या साध्या बोधवाक्याने आनंदी जीवन जगा. मित्र आणि कुटूंबियांमध्ये बसून, एकत्र जेवताना, शाळेच्या जुन्या भेटीमध्ये, खूप दिवसांपासून हरवलेल्या मित्राकडे धावताना, ज्याची गरज आहे अशा व्यक्तीला स्मितहास्य देताना तुम्ही चांगले हसले नाही का? तुम्ही नंतर विचार करण्यात वेळ घालवला नाही का? हेच लिव्ह हॅप्पीचे उद्दीष्ट आहे व अधिक मुलांच्या जीवनात वाचनाचा आनंद पसरविण्यासाठी बुकवॉर्मला तिथे परवानगी दिल्याबद्दल मी लिव्ह हॅप्पी ऑर्गनायझेशनचे आभार मानू इच्छितो.

हा प्रवास संपलेला नाही तर आत्ताच कुठे तरी सुरू झाला आहे आणि मला आशा आहे की तो तसाच राहिल हीच सदिच्छा. शेवटी एक कविता…

पुस्तकांच्या बंदखणितून शब्द बाहेर पडले,

मित्रांना शोधाता – शोधाता.. इथे – तीथे धरपटले, 

पणजीला त्यांनी आकाशाला गवसणी घातली,

आणि लिव्ह हॅप्पीला पोहचताच जणू शितीज फुलले,

आज बुकवर्म लायब्ररीमधील शब्द लिव्ह हॅप्पीला फिरुन आले.

पावसासारखे चिंब भिजवून जणू पुस्तकाच्या दुनियेत लुप्त झाले. (2)

Leave a Reply