Bookworm Trust

Written by:

कॉलेज संपता – संपता ब्लड कॅन्सरची लागण झाली आयुष्य खूप बदललं. आयुष्य कसंबसं सावरून मी कॅन्सरमधून बरा झालो. आत्ता पुढे काय असा प्रश्न पडला. M.A करायचं होतं पण पैसे नव्हते, परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या जाहिराती पाहिल्या वेगवेगळे इंटर्वी दिले त्यानंतर असं ध्यानात आलं की बुकवॉर्म लायब्ररीमध्ये, लिब्रारीज इन स्कूल प्रोग्रामध्ये क्लस्टर कोर्डींनेटर म्हणून जागा रिकामी होती. “बुकवॉर्म” नाव ऐकलंय कसं वाटत होतं. जणू काही तरी जुन नातं असावं. मी तुरंत गूगल सर्च केले आणि इंटरवी दिला, सिलेक्ट झालो व माझी बुकवर्ममधील जर्नी इथेच कुठतरी सुरुवात झाली.

बुकवर्म हे फक्त नाव नसून ते उत्कृष्ट पुस्तक प्रेमींचे मुख्य हृदय व्यक्त करते तसेच  मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, ज्यांना वाचण्यासं कोणतीही सहज पुस्तक भेटत नाही अशा मुलांसाठी संधींची क्षितिजे विस्तृत करणे, एक साधन तयार करणे जे लिखित शब्द समजून घेण्याची आवश्यकता सक्षम करते आणि ओळखते हे बुकवर्मचे ध्येय आहे.

वाचन ही एक भाषा आहे. त्यात बहुविध वास्तवांची गुरुकिल्ली आहे. एकदा आपण त्यात गुंतलो की, आपले सामाजिक-सांस्कृतिक वातावरण आपल्याला ज्या चौकटीत बसवू शकते त्या पलीकडे विचार करण्याचे सामर्थ्य देते. बुकवर्म अनेक मार्गांनी हे साध्य करण्याचा प्रयत्न करतो.  आणि लायब्ररी इन स्कूल प्रोग्राम (LiS) संवादात्मक सत्रांद्वारे पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत वाचनाची कला, आवड प्रकट करते. कथा सांगणे हे कथात्मक स्वरुपाचे सर्वात जुने दालन आहे. या नवीन असलेल्या समुदायांसाठी साक्षर व्हायला शिकणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. लायब्ररी इन स्कूल्स (LiS) कार्यक्रमाचे उद्दिष्ट शिक्षण, साक्षरता आणि मानवी अनुभव मजबूत करण्यासाठी या दोन मजबूत शैक्षणिक पद्धती एकत्र आणणे आहे.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे मुले वाचतात त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून येते. वाचनाचा भाषा विकास, शुद्धलेखन आणि सर्जनशीलता यांचा मजबूत संबंध आहे. कथाकथन आणि कथा वाचनाच्या अध्यापनशास्त्राद्वारे अ-साक्षर आणि साक्षर जगाला जोडणे उत्तम प्रकारे केले जाते. सर्जनशीलता आणि कलात्मक क्षमता देखील दृश्य उत्तेजनाद्वारे मजबूत केली जाते जी चांगल्या चित्र / सचित्र पुस्तकांमधून येते. 

लायब्ररी इन स्कूल प्रोग्राम (LiS) शाळेत जाणार्‍या मुलांना योग्य वाचन संसाधने प्रदान करते आणि विचार आणि साक्षरता कौशल्ये विकसित करण्यासाठी कथा सांगण्याची पद्धत वापरते. काळजीपूर्वक निवडलेल्या, श्रेणीबद्ध, वयोमानानुसार विविध प्रकारच्या पुस्तकांची खाण मुलांपर्यंत पोहचविते तसेच ब्राउझिंग आणि पुस्तक ओळख ह्या मार्फत साक्षरतेसाठी कौशल्ये विकसित करण्यास भर देते. “Read a Aloud” मार्फत कथा जिवंत करते व ज्ञानात भर घालते तसेच  “Extension Activity” मार्फत साक्षरता व सर्जनशील विकसित करणे व पुस्तकातील कथेला मजबूत करणे. हे ह्या प्रोग्रामचे मुख्य नीव आहे व पुस्तक आदान – प्रदान करणे ज्यामुळे वाचन ही एक निरंतर क्रिया राहील आणि त्यामुळे वाचण्यासाठी पुस्तके घरी नेणे हेच ह्या प्रोग्रमचे खरे ध्येय आहे.   

SCERT आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या अतांग समर्थनमुळे   आम्ही अधिक मजबूत आणि अधिक उद्देशपूर्ण कामगिरी करीत आहेत. SCERT आणि सिप्ला फाऊंडेशनने आमच्यात निर्माण केलेल्या सक्षम आणि दूरदृष्टीमुळे आम्ही गोव्यातील दोन तालुक्यांमध्ये छोट्या सरकारी प्राथमिक शाळांचे पुनर्संचयित करत आहोत. आमच्या निवडीबद्दल आम्हाला कधीही प्रश्न विचारला गेला नसला तरी, आम्हाला विस्तारित करण्यासाठी, मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सगळे मार्ग मोकळे केल्याबद्दल आम्हाला प्रोत्साहित केले म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत. 

मुलांना त्यांच्या शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये समृद्ध, उच्च दर्जाचे, वैविध्यपूर्ण वाचन साहित्यात फारच कमी भेटते. लायब्ररी आणि लायब्ररी ‘पीरियड्स’ अद्याप प्राथमिक शाळमध्ये रुजू झालेली नाहीत. पण लायब्ररीस इन स्कूल प्रोग्राम मार्फत ह्या वर्षी आम्ही १०४ सरकारी व अनुदानित शाळांना पुस्तके उपलब्ध करून देल्या आहेत‌ आणि फक्त पुस्तके देऊन आम्ही थांबलो नसून वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी नवीन कथा वाचन, लायब्ररी गेम्स व क्राफ्ट/ Art ॲक्टिव्हिटी करून  मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करत आहोत. तसेच ह्या वर्षी “ट्रावेलिंग लायब्ररी” सुरू झाल्या कारणाने कार्यक्रमात नवीन जोश व स्पुर्ती तयार झाली आहे. “Tabs” पण शाळेमध्ये एक वेगळीच जादू करत आहे. हे सगळं काही शिक्षकांच्या पुढाकारपणात आणि आम्ही स्वतः त्या शाळेत जऊन वाचनाचा आनंद पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे खूप रोमांचक आहे. या वर्षासाठी आमच्या कार्याच्या व्याप्तीमध्ये वाढ झाली असली तरी आम्हाला हे देखील माहित आहे की आम्ही अशा प्रकारे येथे पोहोचलो कारण SCERT, सिप्ला फाउंडेशन आणि शिक्षक यांचे आम्हाला खूप समर्थन आहे. त्यामुळे अनेक कथा आणि अनेक पुस्तक आम्ही मुलांपर्यंत पोहचवू शकलो. आता कदाचित एखाद्या दिवशी शब्द उड्डाण घेईल आणि आकाशाचा दावा करेल.

लायब्ररीस इन स्कूल कार्यक्रमाने मला गोव्याच्या आसपासच्या अनेक प्राथमिक शाळा आणि लोकांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ दिले. आज लायब्ररीस इन स्कूल कार्यक्रमात क्लस्टर कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असतांना बुकवर्म लायब्ररीचा भाग बनू शकल्या बद्दल मी धन्यता मानतो. ५ महिन्यांच्या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. मुलांसोबत काम करणे मला आनंददायी अनुभव देते, स्पूर्ती देते आणि ज्ञानाचे पालनपोषण करते. अनेकदा मुले देखील बुकर्वम सेशनची वाट पाहत असतात आणि त्यांचा प्रतिसाद आणि बुकर्वमबद्दलचे प्रेम पाहून आनंद होतो आणि हे माझे अध्यापन कौशल्ये, संभाषण कौशल्ये, आत्मविश्‍वास आणि नवीन ऊर्जा मिळवण्यास मदत करते. हा प्रवास लहान असो वा मोठा पण तो मला एक चांगला माणूस बनवत आहे. शिक्षक, ज्यांच्याशी मी बुकवर्म मार्फत संवाद साधत आहे ते पण माझ्या ज्ञानात आणि अनुभवात भर घालत आहेत. शिक्षक लायब्ररीस इन स्कूल कार्यक्रमाने खूप प्रभावित झाले आहेत आणि त्यांना पण बुकवर्मचे सत्र त्यांच्या शाळेत करायचे आहे कारण मुले त्यात सहभागी होण्यास उत्सुक होतात व त्यांच्या कलेला पण चालना मिळेते. मला हे सगळं अनुभवत असतांना आनंद होतो आणि मला ह्या सगळ्यात शामील केल्याबद्दल मी बुकवर्म संस्थेचा ऋणी राहीन. कदाचित आता शब्द बोलके होहील. 

 

Leave a Reply