Written by Sanjeevani Atre
गोवा म्हटले की, डोळ्यासमोर येते ती मोज मज्जा
पण गेले पाच दिवस मी वेगळ्याच विश्वात फिरून आले.
इथे मोज मज्जा आहे,पण ती मुलांच्या भावविश्वाची
या पाच दिवसात आम्हांला एकदाही कार्यक्रमाच्या हाँल बाहेर सोडण्यात आले नाही.आमचा बाहेरच्या जगाशी संबंधच संपला. आता आतल्या जगात डोकवायला सुरूवात झाली होती.खरेतर सकाळी ९ वाजता सुरू झालेला कोर्स रात्री ९ वाजता संपत होता.एवढी एका ठिकाणीं बसायची सवयच नाही,कारण रोजच आपल्यालातले मूल फिरत असते.पण इथे एका जागी बसून अभ्यास करत होतो.
वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आमचा ताण कमी करण्यात येत होता,हो पण हे खेळ होते ते मुलांच्या भावविश्वातले
रोज नवीन नवीन शिकत होतो.
आमच्या सगळ्यांच आवडणारी गोष्ट म्हणजे आस्थाचल दररोज ३५ मि.घेतली जात होती. हा एक मेडीटेशनचाच भाग आहे,इथे सगळेच एकमेकांच्या बरोबर तर होतो.पण कोणी कोणाशी बोलायचे नाही.स्वतःला शोधायचे म्हणजेच आपल्यातील लहान मुलाला जो या दैनंदिन जीवनात हरवला आहे. ते ३५ मिनीट मला नवीन चैतन्य देऊन जात होते ( फक्त मलाच नाही सर्वांना
)
गेले दोन वर्ष अनेक वर्कशाँप, आणि वेगवेगळी ट्रेनिंगला गेले.तिथेही सार्वजनिक ग्रंथालयाला उपयुक्त ठरेल असे खूप काही शिकले,अमलात आणले.तसेच आज मला म्हणावेसे वाटते की,या सात महिन्याच्या कोर्स मधून मी नक्कीच ग्रंथालयातील बालविभागासाठी चांगले काम करू शकेन.
मला बर्याच जणांनी विचारले हा कोर्स सार्वजनिक ग्रंथालयांना उपयुक्त आहे का?? एवढेच काय ज्यांनी कोर्स लिहाला त्या सुजाताने पण विचारले.
काल माझी व्दंव्द अवस्था होती, आपण नक्की येथे येऊन काय काय शिकलो?? रात्रभर विचार चालू होता, 
१. मुलांच्या भावविश्वात रमण्यासाठी आपण घेत असलेले शाळेतली पुस्तक पेटी यामध्ये बदल करता येतील
२. साधे खेळ म्हणजे साप – शिडी,टिपरी – पाणी ,पुस्तकाचे विषय हे ग्रंथालयात चालू करता येतील.अगदी जवळच्या बागेतही घेता येतील.
३. पुस्तक वाचनाची गोडी लावण्यासाठी वेगवेगळी माध्यमांचा उपयोग करता येईल.उदा.गोष्टी सांगण्याच्या पध्दती
४. मराठी – इंग्रजी पुस्तके निवडताना जास्त करून चित्रांची पुस्तके घेणे.
५. आता पर्यंत छोट्या छोट्या कागदावर चित्र काढून घेत होतो,पण आता मोठ्या कागदावर काढताना येणारी मज्जा.
६. कोणतीही कार्यशाळा घेताना त्यातला अर्धा तास गोष्ट सांगणे,पुस्तकाचे खेळ घेणे हे करू शकतो.
हा व्दंव्द आता शांत झाला. येणारे सात महिने मला माझ्यातले मुल बाहेर काढायचे आहे,त्याकरीता वेगवेगळ्या पध्दतीने अभ्यास करायाचा आहे.केवळ आवड म्हणून नाही तर ग्रंथालयातील प्रत्येक मुलाला व्यक्त होण्यासाठी मिळणारा प्लँटफाँर्म हे आदर्श ग्रंथालय असेल. सार्वजनिक असो कि शैक्षणिक दोघांचे हेतू एकच,माध्यम एकच फक्त व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे पण प्रयत्न एकच




आजचा शेवटचा दिवस!!! नवीन उर्जा बुकवाँर्म कडून घेऊन निघणार

संजीवनी