Bookworm Trust

Written by:

पुस्तक वाचनाची आवड मुलांना असणं खुप गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणून नेहमी अश्या काहीतरी उपक्रमाचा भाग व्हायची इच्छा होती, सहज एके दिवशी Bookworm library तर्फे मुलांसाठी होणारे वाचन उपक्रमा बद्दल कळलं आणि मी Bookworm चा भाग झाले.

या उपक्रमाला Mobile Outreach Program म्हणतात, ह्या उपक्रमा मधे आम्ही गोवातिल  Cacra पणजी, Live Happy, Assagao, BLC Boys, Santacruz, Ribander अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो. प्रथम आम्ही त्या परिसरात जाऊन एक जागा शोधतो जिथे आम्ही मुले एकत्रित करु शकू, नंतर आम्ही त्या परिसरातील रहिवाश्यांना भेटतो, त्यांना आमच्या उपक्रमा बद्दल समजावून सांगतो, हे करताना आम्ही बरीच परिश्रम घेतो, ह्या दरम्यान आम्हाला वेगवेगळ्या प्रश्नाना समोर जावं लागतं, जसे पैसे द्यावे लागतील का? मुलना शाळा असते मग कधि येतील? आम्ही त्यांना सांगतो की आम्ही मुलांच्या वेळेनुसार येऊ, त्याना पैसे ध्यावे लागणार नाही. मग आम्ही ह्या उपक्रमात पुस्तक वाचनाबरोबर अजून काय  घेतो ते सगळं समजाऊन सांगतो व आठवड्यात एक दिवस ठरवतो, जी मुले यायला तयार आहेत त्यांची नावे नोंदवीत एक दस्तावेज भरुन घेतो, त्यांच्या आई किव्हा वडील चा नंबर नोंदवून घेतो.

व ठरलेल्या दिवशी आम्ही त्या परिसरात जाण सुरु करतो. ह्या उपक्रमा दरम्यान आम्ही अलग-अलग परिसरात जाऊन मुलांसोबत वेळ घालवतो, पहिले मुलाना एकत्र करतो व त्यांना गाणी शिकावीतो, नंतर मुलांना पुस्तका बद्दल सांगतो, गोष्टींची पुस्तके वाचून दाखवितो व पुस्तका शी निगडित खेळ खेळवितो, खेळ खेळविताना आम्ही लक्ष ठेवतो की मुलाना ह्या दरम्यान काय शिकता येइल, सगळ सहज वाटत असलं तरी सुरुवातीला बरच कठिण गेलं, मुलांना नविन गोष्टींच फार कुतूहल असतं, त्यांच कुतुहल कायम ठेवायला आपण कमी तर नाही पडत असे वाटायचे पण प्रयत्न केला आणि अजुनही सुरु आहे.

पण हे सगळं करत असताना काही सुंदर अनुभव यायला लागले, जेव्हा आम्ही आमच्या ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकानी जातो तेव्हा निरागस मुल आमची वाट पहात असतात, आम्हाला बघुन त्यांच्या डोळ्यात एक चमक येते, हिच मुलं बाहेर दिसली तर असं वाटतं की ही मुले उस्तुक असतिल का, पण त्यांचा बरोबर वेळ घालवल्यावर लक्षात आले की ती खूप हुशार, समजदार आणि जबाबदार आहेत. ती तुम्हाला मन लावून ऐकतात, त्यांना खुप कही शिकायचं असतं, आणि ते लवकर शिकतात, त्याच्याशी लळा लागतो. अलग – अलग परिसरातील मुलांना भेटून खुप बरं वाटलं ह्या सगळ्याच श्रेय Bookworm Mobile outreach program ला.

हा उपक्रम चालवताना आम्ही मुलांच्या खुशीच खास लक्ष ठेवतो, मुलांना कशी कथा आवडेल? कोणती खेळ कार्य त्यांना उत्साहित करेन ह्याचं लक्ष ठेवलं जातं, मुलांना बाहेर शैक्षणिक स्थळ दाखवायला नेल्या जातं, उपक्रमेच्या जागेवर पुस्तकालय बनवल्या जातं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलांच्या आनंदला पारा नसतो.

ही सत्र घेताना मुल बरेच आश्चर्य चकित करतात, उपक्रम करत असताना मुलांचे बरेच सुप्त गुण कळतात, ती चीत्र सुंदर काढतात, एकदा एका मुलाने मला माज़े चित्र काढण्याची परवानगी मागितली, मी त्याची उत्सुकता पाहून त्याला होकार दिला व त्याने मनपूर्वक प्रयत्न केला. हे सगळ मनाला भावनार असतं.

ह्या प्रवासात मला अजून एका उपक्रमचा भाग होता आलं ज्यात आम्ही मुलांच्या/ मुलींच्या वसतिघृहा ला भेट देतो. त्यात आम्ही मुलांना आमच्या कडून पुस्तकलय बनवुन देतो, मुलीशी संवाद साधतो, दरवेळी मुलींना/ मुलांना नविन पुस्तके वाचून दाखवितो, नविन नविन क्रियाकलाप शिकवितो, मुलांना वाचन कला वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्यांंना नवीन घडामोडी शी अवगत करतो. वसतिगृहतिल मुलांशी संवाद साधताना एक लक्ष्यात आलं की फक्त शैक्षणिक शिक्षण पूर्ण नाही, मुलांना शैक्षणिक सपुर्न बनवायला आमचे उपक्रम एक महत्वाचा भाग पूर्ण करतो.

एक गोष्ट सांगावीशी वाटते, मुलांना सुट्या मधे काहीतरी वेगळं कारावस वाटते आता गणपती च्या सुट्ट्या मधे आम्ही एका सत्राला गेलो तेव्हा आम्ही मुलांना त्यांची  सुट्टी कशी चालली हे विचारले तेव्हा एका मुलाने म्हटले की “कंटाळवाणी!! तुम्ही येता तो एक तास फक्त मजेत जातो” खरचं तेव्हा आमच्या च्या उपक्रमा च खरं महत्व कळलं. खुप समाधानी वाटतं की मला ह्या उपक्रमचा भाग व्हायचं सौभाग्य मिळालं.

मुलांकडून खुप काही शिकायला मिळालं. सुजाताच्या ह्या ऊपक्रमची मी प्रसंशा करते आणि मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद देते.

Leave a Reply